वेगवेगळे "लोक" म्हणजे काय ? देवदेवता , त्यांचे प्रकार व त्यांचे गण
आपण या ठीकाणी चर्चा करत असलेल्या अतिमानविय म्हणजे "बाहेरील" जगाशी संबंधीत अशा आणखी एका विषयाला आपण सुरवात करत आहोत. तो विषय म्हणजे "देवता". आपला भारतीय समाज हा व्यक्ती पुजक आहे. एखाद्या चांगले काम केलेल्या महान व्यक्तीला देवता मानुन त्याची पूजा केली जाते. प्राचीन भारतीय तत्वज्ञानानुसार पाहता भारतीय समाजाने त्या शक्तिंना देवता मानले आहे अशा देवता दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे उच्च देवता व दुसरे म्हणजे कनिष्ठ देवता. उच्च देवतांमध्ये विष्णू, ब्रम्हा, शंकर, हनुमान, श्रीराम, कृष्ण अशा अध्यात्मीक शक्ती येतात तर कनिष्ठ देवतांमध्ये रेणूका, यल्लम्मा, सात असरा, बिरोबा, म्हसोबा, जोतीबा, मरगाबाई वगैरे वगैरे देवता येतात. या देवता म्हणजे एक प्रकारच्या शक्ती किंवा उर्जा असतात पैकी कनिष्ठ देवता भुलोक व भुवलोक या मणुश्यांशी निगडीत अशा स्तरांवर कार्यरत असतात तर उच्च देवता त्यांच्या पलिकडील स्तरांवर कार्यरत असतात त्यामुळे आपल्याला सामान्यत: कनिशःठ देवतांचे अस्तित्व जानवताना आढळते.
भग्वद्गिते मध्ये एके ठिकाणी म्हटले आहे की , मनुश्य ज्या ज्या देवतेला भजतो , मृत्यु नंतर तो त्या त्या देवतेला जाऊन मिळतो.
यान्ति देवव्रता देवान्वितृन्यान्ति पितृवत: ॥
भूतानी यान्ति भुतेज्या यान्ति मद्याजिनोपी माय ॥ (भ.गी ९:२५)
अर्थ:- जे देवदेवतांची पुजा करतात, त्यांना देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो, जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात, जे भुतांची उपासना करतात, त्यांना भुतयोनिमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पुजा करतात, ते माझी प्राप्ती करतात.
हा श्लोक वर वर पाहता त्यातील अर्थ निट आपल्याला समजत नाही परंतु अधीक खोल जायचे ठरवल्यास या श्लोकातील गहणता आपल्याला लक्षात येते. अध्यात्मिक दृष्टिकोणातुन पाहता मनुश्याने मोक्ष मिळवण्यासाठी स्वत:ची अध्यात्मिक प्रगती केली पाहीजे. वर वर पाहता मोक्ष हा दोन शब्दांचे अक्षर परंतु वर आपण पाहील्याप्रमाणे थोडीशीही वासणा मनामध्ये राहिली असता मनुश्याची गती म्हणजे पुढील जन्म मिळण्यास अडचण निर्माण होते , तर याठीकाणी आपण गतीच्याही पलिकडील अवस्था म्हणजे मोक्ष बद्दल बोलत आहोत. मोक्ष म्हणजे अध्यात्मिकतेची इतकी उच्च पातळी की जेथे पुढे जन्म घेण्याचे कारण संपते. जेथे गती मिळण्याची मारामार तेथे मोक्षाचा विषयच नको. सांगण्याचा उद्देश केवळ एवढाच की अध्यात्मामध्ये आपण मणुश्याने आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी आणि पर्यायाने मोक्षासाठी प्रयत्न केले पाहीजेत आवश्यक नाही की मोक्ष एकाच जन्मात येवुन जाईल त्यासाठी जन्मो-जन्मिची कठोर साधनाही करावी लागते , या जन्मी केलेली अध्यात्मिक साधना मृत्युनंतर संपत नाही तर पुढील जन्मापासुन पुढे कंटीन्यु होते अशातर्हेने एखाद्या जिवाला मोक्षासाठी जन्मो जन्मी अध्यात्मिक साधना करावी लागते. परंतु काही वेळा असे होते की मनुश्य अनेकप्रकारच्या कनिश्ठ शक्तिंच्या आधिन होऊन त्यांची आराधना करायला लागतो. मग त्यांपैकी काही शक्ती सात्विक असतील तर काही तामसिक जसे भानामती या देवीची उपासना ही तामसीक लोक करतात ज्यांना अघोरी उपासक म्हटले जाते त्याचप्रमाणे वर उल्लेख केल्याप्रमाणे जे कनिष्ठ देवता आहेत त्या सत्विक देवता होत, या तम-सत्व कनिष्ठ शक्तिंपासुन मिळणारी फलिते ही त्वरित असल्याने मणुश्य अशा त्वरीत फळाच्या मोहाला भुलुन या शक्तिंच्या आधीन जातो व आयुश्यभर त्याच शक्तीच्या आधीन राहतो. आणि शेवटी मृत्युनंतर त्याचे तेच होते जे वरील श्लोकामध्ये वर्णन केले आहे तो मणुश्य त्या त्या कनिष्ट शक्तीला जाऊन मिळतो. म्हणजे मृत्युनंतर तो मणुश्य त्या शक्तीच्या अधिपत्याखाली त्या शक्तीचा एक "गण" म्हणुन राहतो. तो अशा अवस्थेत तेथे किती काळ असतो हे कोणीही सांगु शकत नाही . परंतु येथे हे समजुन घेणे आवश्यक आहे की अशाप्रकारे गण बणुन राहणे ही पिशाच्चावस्था नक्कीच नाही. या अवस्थेत त्या जिवाला त्या त्या शक्तीचे मार्गदर्शन असते , त्या शक्तीच्या अधिपत्याखाली तो जीव काम करत असतो. आणि हेच कनिषठ स्शक्तीचे गण पुढे एखाद्याच्या अंगात जाणे, त्या त्या शक्तीच्या पृथ्वितलावरील एखाद्या साधकाने काही परंपरा खंडीत केली असता त्याला दंडीत करणे, एखादा व्यक्ती पिडीत असेल तर अंगात जाऊन त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करणे इत्यादी कामे हे गण त्या त्या शक्तीच्या आधिपत्याखाली करत असतात. यापैकी अंगात येणे / संचारण होणे हा प्रकार जवळ जवळ सर्वांना माहीतच असेल. काय असते अंगात येणे म्हणजे ? आम्हाला आमच्या सर्वेक्षणामध्ये असे आढळले की बरेच लोक केवळ लोकांचा मान मिळावा म्हणुन अंगात आल्याचे ढोंग करतात . परंतु काही लोकांच्या खरोखरच अशा शक्ती शरीरात प्रवेश करुन मार्गदर्शन करत असतात. एक उदाहरण घेवुया . रेणुका ही एक कनिष्ठ देवता आहे ही देवता अंगात येण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता रेणुका ही देवता ज्याच्या घरी कुलदैवत म्हणुन आहे अशा एखाद्या व्यक्ती कडून त्या देवतेचे काही कुलाचार पाळायचे राहुन गेले असता रेणुका या देवतेचे गण त्या व्यक्तीला त्रास द्यायला चालू करतात. शेवटी कंटाळून तो व्यक्ती अशा एका माध्यमाकडे जातो की जिच्या अंगामध्ये रेणुका देवीचा संचार होतो तेव्हा वास्तवीक होते असे की जे रेणुका देवीच्या अधिपत्याखाली गण आहेत ते त्या माध्यमाच्या शरीरामध्ये संचार करत असतात आणि पिडीत व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नाचे समाधान करत असतात. आश्यक नाही की प्रत्येक वेळी त्या व्यक्तीवर येणारी समस्या याचे कारण त्या रेणुका देविचा कोपच असेल यातील बराचसा भाग हा माणसशास्त्रीय ही असु शकतो , मी स्वत: एक माणसशास्त्र अभ्यासक असल्याने ही शक्यता टाळु इच्छीत नाही परंतु सर्वच भाग हा माणसशास्त्रीय आहे असे म्हणने चुकीचे ठरेल.
कनिष्ठ देवदेवता व त्यांची कार्ये : वर आपण पाहीले की या कनिष्ठ देवतांपैकी काही देवता या सात्विक असतात तर काही तामसीक असतात. त्यांच्या या सात्विक व तामसीक प्रवृत्तीवरुनच त्यांची कार्ये व कार्यक्षेत्रे व कार्ये ठरलेली असतात. सात्विक देवतेंची कार्ये ही सात्विक असतात तर तामसिक शक्तिंची कामे ही तामसीक असतात. व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले गण हे त्या त्या देवतेच्या कार्यांची व्यवस्था पाहत असतात. एक उदाहरण घेवू, भानामती ही शक्ती तामसीक शक्ती आहे. भानामती ही शक्ती अशी आहे की ती तिच्या भक्तांना, किंवा उपासकांना त्वरित फळ देते परंतु हे ही तितकेच खरे की भानामतीचे उपासक ज्यांना अघोरी उपासक सुद्धा म्हटले जाते ते त्यांचा अंत शेवटी वाईटच म्हणजे अघोरी पद्धतीने तर होतोच शिवाय ते शेवटी मृत्युनंतर त्याच भानामती शक्तीच्या अधिपत्याखाली तिचे गण म्हणुन पुढचा जन्म मिळेपर्यंत राहतात (भानामती किंवा करणी प्रकार कसा चालतो हे आपण पुढे सविस्तर बघणार आहोतच). आणि असेच सात्विक शक्तिंचे आहे.
भानामती किंवा करणी कशी काम करते : वर आपण पाहीले की भानामती ही एक तामसिक देवता आहे. अघोरी पद्धतीने तिचि उपासना केली जाते. याठीकाणी मला सांगणे अवश्यक आहे की मंत्र व तंत्राचे दोन प्रकार आहे एक म्हणजे "घोरी" म्हणजे सात्विक व "अधोरी" म्हणजे तामसीक. घोरी मंत्र हे वेगळे असतात व अघोरी मंत्र वेगळे असतात. घोरी मंत्र हे सात्विक शक्ती आकर्षीत करतात तर अघोरी मंत्र हे तामसिक शक्ती आकर्शीत करतात. भानामती देवतेचे उपासक हे अघोरी मंत्रांचा व तंत्रांचा वापर करुन भानामती देवतेकडून इच्छीत कार्मे करुन घेतात अशी कामे ही त्या उपासक व त्यांच्या उपासनेप्रमाणेच तामसीक असतात उदा. मारणकर्म (एखाद्याला मारणे), वशीकरण (एखाद्याला वश करणे) तसेच एखाद्याला एका आजाराने त्रस्त करणे ना केवळ एकाला तर पुर्ण घराला अशाप्रकारे त्रास दिला जातो . आणि असे करणारे म्हणजे भानामतीच्या माध्यमातुन एखाद्याला अशाप्रकारे बरबाद करणार्यांचा अंतही शेवटी असाच अघोरी असतो हे बर्याच लोकांना माहीत नाही. हे नेमके होते कसे हे थोडक्यात पाहू... एखादा मनुष्य आपल्या वैर्याचे नुकसान व्हावे म्हणुन अशाप्रकारच्या अघोरी उपासकाकडे जातो आणि त्याच्या वैर्याला आमुक एक प्रकारचा त्रास देण्यासाठी सांगतो आणि त्याच्या बदल्यात तो अघोरी उपासक भानामतीच्या माध्यमातुन पर्यायाने भानामतीच्या अधिपत्याखाली असलेल्या गणांच्या माध्यमातुन इच्छीत काम करुन घेतो. आता हे होते असे की तो अघोरी उपासक भानामतीच्या अधिपत्याखाली असलेल्या गणाला त्या त्या व्यक्तीला पकडून त्रास देण्यास सांगतो. तेव्हा तो गण पर्यायाने ती वाईट शक्ती अशा अनैसर्गिक प्रकारे त्या व्यक्तीला त्रास द्यायला
सुरवात करते, त्या व्यक्तीला होणारा त्रास हा "अनैसर्गीक" किंवा अतिमानवीय असल्यामुळे साधारण मनुश्यांना किंवा डॉक्टर्स ना अशा आजारांचे किंवा घटनांची उपपत्ती लावणे शक्य होत नाही. हा या भानामतीच्या अधिपत्याखाली असलेल्या अघोरी, तामसिक अतिमानवि शक्तिंकडून होणार्या अनैसर्गिक त्रासालाच "करणी" म्हटले जाते. अशाप्रकारच्या करणीची उदाहरणे कितितरी आपल्याला पहायला मिळतील. काही लोक करणी वगैरे मनाचे खेळ मानतात, याठीकाणी हे लक्षात ठेवले पाहीजे के ज्यांना आपण करणीचे प्रकार म्हणतो त्यापैकी काही प्रकार हे "माणसीक" असु शकतील परंतु सर्वच प्रकार हे माणसीक अशु शकत नाहीत, आणि जर असतील तर असे म्हणनार्यांनी अशा घटना कशा घडतात हे सिद्ध करणे तर सोडूनच द्या तर केवळ यांची भौतीक उपपत्ती म्हणजे केवळ बौद्धीक स्थरावर लॉजीक लावुन दाखवावे. अशाप्रकारच्या घटनांबद्दल अधिक माहितिसाठी वाचकांनी प्राचार्य. अद्वयानंद गळतगे यांचे "विज्ञान व चमत्कार" हे पुस्तक वाचावे या मध्ये अशाप्रकारच्या बर्याच घटना लेखकाने स्वत: अभ्यास करुन नोट केल्या आहेत.
करणी प्रकारावर तोडगा काय ? : आता तुम्ही विचाराल की अशा अतिमानवी , नैसर्गीक आणि भयानक प्रकारावर उपाय काय ? तर मी एवढेच सांगेन की प्रत्येक आजारावर किंवा समस्येवर उपाय असतो तो त्याच्या स्तरावर शोधावा लागतो म्हणजे अतिमानवी समस्येवर मानवि उपचार किंवा उपय लागु होत नाहीत, या अतिमानवी समस्येवर उपायही अतिमानवि असतात. वरील पुर्ण करणीच्या विवेचनावरुन हे लक्षात आहे असेलच की सगळा प्रकार साधारण तामसिक तत्वाखाली चालतो. आणि इथेच समस्येचे निराकरण आहे तामसिकतेवर मात ही केवळ सात्विकतेने होते. प्रकाशाने अंधार बाजुला होतो, शितलतेने दाह कमी होतो त्या प्रमाणे सात्विकतेने तामसिकता दुर होते, जसे पुर्ण अंध:कार दुर होण्यासाठी केवळ प्रकाशाचा एक कवडसा ही पुरेसा असतो, त्याप्रमाणे या तामसिकतेच्या राक्षसांना दुर करण्यासाठी ही सात्विकतेचा एक कण ही पुरेसा असतो. परंतु अशाप्रकारच्या समस्येने पछाडलेला मणुश्य न कळतपणे तामसिकतेला पुरक असेच वातावरण हळू हळू करुन देत असतो, ते कसे , तर अशाप्रकारची समस्या उद्भवली असता सतत डोक्यात तामसीक म्हणजे समस्येसंबंधी विचार आनने, सतत गंभीर राहणे पर्यायाने त्याच्या आजुबाजुचे वातावर गंभिर , एखाद्या मयतासारखे व तामसिक बनते घरचे पुजापाठ थांबतात वगैरे वगैरे. आता तुम्ही हा लेख वाचत आहात यापुढे किंवा केव्हाही तुमच्या बघण्यात असा अतिमानवि प्रकार आला तर नेहमी लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या तामसिकतेला एक तर खरा सात्विक सत्पुरुष दुर करु शकतो किंवा ति पिडीत व्यक्ती स्वत:. परंतु आताच्या काळात पैशासाठी केवळ सोंग घेवून गजावजा करणारे ढोंगी सगळीकडे पसरलेले आहेत. अशा ढोंगिंच्या जाळ्यात न फसता स्वत:च्या समस्येचे निराकरण स्वत:ची सात्विकता वाढवुन आणि स्वत:च्या सामर्थ्यावर करणे इष्ट ठरेल . मग असे करताना तुम्हाला जे काही करु शकता ते ते करा, पुजा-पाठ, होम हवण, तिर्थ यात्रा, विशेशत: रामरक्षापाठ आणि हनुमान उपासनेमध्ये खुप शक्ती आहे सात्विकता वाढवण्याची. पण हे करताना एक लक्षात ठेवा की असे करताना वातावरणाची सात्विकता ही दुय्यम स्थानावर आहे सर्वात महत्वाची आहे ती "मनाची" सात्विकता. तुमचे मन जितके सात्विक आणि निर्मळ बनत जाईल तसातसे तुमच्यावर पकड असलेली तामसीक शक्तीचे फास ढिले पडत जातील आणि एक दिवस ही अतिमानवी तामसिक शक्ती तुमच्यातील सात्विकतेपुढे गुढगे टेकेल.
आणि समारोप : हे जग असंख्य शक्यतांनी भरलेले आहे, येथे काहीही होऊ शकते चांगले ही आणि वाईटही. केवळ आजपर्यंत तुम्ही जेवळे पाहीजे तेवढ्यावरच हे जग मर्यादीत नाही, या सृष्टीला मर्यादा नाहीत . त्याचप्रकारे यामध्ये कार्यरत असलेल्या असंख्य कार्यक्षेत्रांनाही मनुष व जिवजंतु हे या शृष्टीवरील एक कार्यक्षेत्र झाले परंतु अशाप्रकारची आणखीन किती कार्यक्षेत्रे अस्तित्वात आहेत आणि ते आपल्यावर किती प्रभाव पाडू शकतात हे आपण नाही सांगु शकत कारण आपल्या ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत. जाता जाता केवळ येवढेच सांगेन की आपल्या मनाची सात्विकता आणि समतोल ढळू देवू नका , जर मन सात्विक असेल तर समतोलपणा ही येतोच. पण मन जर तामसीक असेल तर मनाचा समतोल ढासळतो आणि हेच सर्व समस्यांचे आणि मानवि व अतिमानवी दु:खांचे कारण आहे. मनाची सात्विकता आणि निर्माळता तुम्हाला सर्व काही देवुन जाते मानवि स्तरावरही आणि अतिमानवी स्तरावरही , असे नाही की मनाची सात्विकता केवळ पुजापाठ आणि कर्मकांड केल्याने प्राप्र्त होते, तर बरेच प्रकार आहेत जसे योगसाधना, प्राणायम, ध्यानधारणा, भगवान बुद्धाची विपश्यना, पतंजलिंचे यम नियमांचे पालन अशाप्रकारे बरेच. शेवटी तुम्हा सर्वांसाठी या शृष्टीमधील तर्व सात्विक शक्तींकडे माझे एकच मागणे की ... सात्विक रहा !!
अहंकाराचा वारा न लागो राजसां । माझ्या विष्णूदासां भाविकांसी ॥
जय श्री राम
- सुरज महाजन
९६ ६५ ३५० ३३०