लॉजिक वर अवलंबुन रहू नका

आपण लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल, एका यात्रे मध्ये एका लहान मुलाची आई आरडा-ओरडा करत असते की तीचे कडेवर असलेले मुल यात्रेमध्ये हरवले , या परीस्थीत ती कावरी बावरी होऊन इकडे तीकडे आपल्या मुलाला शोधते मध्येच मुलाच्या नावाने टाहो फोडते तीचे रड्णे पाहून एखादा व्यक्ती तिला विचारतो, ’तुच्या कडेवर असलेले मुल कोनाचे आहे ’? अर्थात त्या यात्रेमध्ये या महीलेच्या मणाची अवस्था अशी झालेली आहे की तीचे मुल तिच्या कडेवर असुनसुद्धा ती आपल्या मुलाला एकडे तिकडे शोधत असते. याचप्रमाणे आपल्याला ही कधी कधी असा अनुभव आला असेल की एखादी वस्तु आपल्याच हातात किंवा आपल्या आसपासच असते तरीसुद्दा आपण तीचा इतरत्र शोध घेतो. कधी कधी आपली पर्स आपल्याच हतात असते आणि आपण ती आपल्या पाठीवरील बॅग मध्ये शोधतो. कधी आपल्या हातात पेण असतो आनी तो आपण ड्रॉवर मध्ये शोधतो. कधी आपल्याच कपाळावर आपला चश्मा अथवा गॉगल असतो आणि आपण तो इतरत्र शोधत असतो. असे का होते हा वेगळा माणसशास्त्रीय विषय आहे आणि ते याठीकानी महत्वाचे नाही मला फक्त याठीकानी एवढे स्पष्ट करायचे अहे की .. आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल जागरुक नसतो. तुझे आहे तुजपासी ... परी तु जागा चुकलाची ! अगदी याचप्रमाणे.

आता मी जास्त विषय  न वाढवता सरळ विषययास सुरवात करतो . माणवी शरीर ! आपले शरीर हे असंख्य प्रमाणात असलेल्या सुप्त शक्तींचे भंडार आहे. आपण स्वत:ला केवळ एक सिमित शरीर समजतो, दोन हात दोन पाय एक धड व डोके असलेले एक हाडामांसाचे शरीर, केवळ एवढीच आपल्याला आपल्या शरीराची ओळख असते आणी व या मर्यादीत विचारामुळेच आपण आपल्या शरीरात निवास करत असलेल्या अमर्याद शक्तीविषयी अज्ञात असतो . आता या सुप्त शक्ती म्हणजे नेमक्या कोणत्या ? आपण एक एक पाहत जाऊया .


मणुष्य हा पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली प्राणी आहे आणि कोणत्याची एका हाडामांसाच्या माणसाच्या शरीरापेक्षा कितितरी पटीने शक्तीशाली आहे त्याचे ’मन’ आणि त्याहीपेक्षा शक्तीशाली आहे त्या मणामध्ये वास करत असलेले सुप्त अवस्थेतील अंतर्मण/innermind/ अर्धजागृत मन/ सृजन मन. या अर्धजागृत किंवा अंतर्मणतील शक्तींचा वापर वर सांगितल्याप्रमाणे त्या संबंधीच्या अज्ञानामुळे फारसा करु शकत नाही. आणि ही अमुल्य शक्ती तशीच बेकार पडुन राहते. इतकंच नव्हे तर स्वत:मध्ये इतक्या प्रचंड शक्तीचे भंडार असूनदेखील केवळ त्याच्याकडे लक्ष्य न दिल्यामुळे अनेक लोक दु:खाने भरलेले सामान्य आयुष्य कंठत राहतात. आपणाला माहीत नसेल तर मला सांगणे आवश्यक आहे की संमोहणशास्त्रा मध्ये मणाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे बाह्य-मण आणि दुसरे म्हणजे अंतर्मण . एक सामाण्य मणुष्य आपल्या एकूण क्षमतेच्या केवळ पाच ते आठ टक्के मणाच्या क्षमतेचा वापर करतो. आणी बाकीची क्षमता ही सुप्त अवस्थेत असते. वर सांगीतल्याप्रमाणे मनाचे दोन भाग आहेत बाह्यमन आणि अंतर्मण, पुढे जाण्याआधी आपण बाह्य व अंतर्मणाची ओळख करुन घेवू .  बाह्यमन : सध्या तुम्ही हा लेख वाचत आहात म्हणजे सचेतन अवस्थेत आहात, तुमचा मेंदू विचार करत आहे , काहीतरी लॉजीक लावत आहे. जसे या लेखामध्ये सांगीतले आहे ते खरेच असु शकते का ? किंवा याच्याही पलीकडे काही विज्ञान आहे का ? साधारण अशाप्रकारची गणीते तुमचे मन करु लागले असेल. थोडक्यात सध्या तुमचे बाह्यमण जागृत अवस्थेत आहे आणि अंतर्मण अ-जागृत आहे. जेव्ह आपण पुर्णपणे जागे असतो तेव्हा आपल्या त्या अवस्थेला जागृत अवस्था असे म्हणतात. त्या अवस्थेमध्ये आपलं बाह्यमण पुर्णपणे जागृत असते. या जागृत मणाचा एक विषेश गुण म्हणजे की जे चुकीचा किंवा बरोबर तर्क सतत करत असतं. सतत जिथे शंका निर्माण होत असतात. प्रश्न निर्माण होत असतात. जे मोजत असतं , पृत्थ:करण करत असतं अशा कामात ते व्यग्र असतं . बाह्यमण हे लॉजीकल आहे आपल्या सभोवती त्याला जे दिसते , त्याला मीळत असलेले अनुभव, अनुभूती, स्पर्ष, रुप, गंध , संस्कार इत्यादीवरुन बाह्यमणामध्ये आपले "विचार" तयार होतसतात जे त्याच्या स्वभावाप्रमाणेच लॉजीकल असतात. हे बाह्यमण आपल्या एकूण मनाच्या २०% एवढेच असते आणि बाकी उरते ते ८०% सुप्त अवस्थेतील शक्तीशाली अंतर्मण किंवा अर्धजागृत मन , आपल्या सर्व सवयींचे कारण आपले अर्धजागृत मन आहे. अर्धजागृत मनाला कोणतीही माहीती किंवा सूचना सारख्याप्रमाणात दील्या तर त्याचं अर्धजागृत मन त्याचा वास्तवीक स्वरुपात त्याचा स्विकार करते . श्वासोच्छ्वास , रक्ताभिसरण, पाचणक्रियादी शरिराच्या काही स्वयंचलीत प्रक्रिया या अर्धजागृत मनाच्या आदेशावरुन होतात. अर्धजागृत मन हे स्थल किंवा काळापासुन मुक्त असते . तुमचे अर्धजागृत मन तुमच्या भावनांना प्रभावीत करते. अर्धजागृत मन हे सृजनात्मक आहे . आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अर्धजागृत/ अंतर्मण हे ’लॉजीक’ च्या पलीकडे काम करणारे (Out of Logic) आहे . लॉजीकच्या सिमा/ बंधने केवळ बाह्यमनासाठी आहे आपल्या अंतर्मणासाठी कोणत्याही सिमा नाहीत. मला माहीत आहे की हे वाचून तुम्ही जरा कनफ्युज झाला असाल. तर मी थोडे स्पष्ट करुन सांगतो. मी सांगतो आहे ते डोळ्यासमोर आणन्याचा प्रयत्न करा... एक माणवि शरीर अशा प्रकारे स्टेजवर ठेवण्यात आले आहे की ... दोन टेबल्स आहेत आनी त्या शरीराचे डोके एका टेबलावर आणी गुडघ्यापासुन खालचा भाग हा दुसर्‍या टेबलावर अशाप्रकारे झोपवण्यात आले आहे की त्याच्या शरीराचा माणेपासुन खाली गुडघ्याच्या वरपर्यंतचा भाग पुर्णपणे अधांतरी आहे आणी अशा अघांतरी शरीरावर मी स्टेजवर जाऊन समजा एक पाण्याणे भरलेली घागर अथवा कळशी ठेवली आणि ते शरीर अजीबात हलचाल करत नाही . किंवा एखादी अवजड वस्तु ठेवुनही त्याचे शरीत ती वस्तु सांभाळू शकते. स्वत:चा समतोल राखु श्कते.


म्हणजे त्याच्या पोटावर ठेवलेल्या अवजड वस्तुचा त्याच्यावर काहीही परीणाम होत नाही.. ! साधारणत: आपल्या लॉजीकल मनाला म्हणजे बाह्य मनाला ही गोष्ट ’अशक्य’ वाटते कारण वरील प्रकार त्याच्या लॉजीकमध्ये बसत नाही. पण असे असले तरी ही वर सांगीतलेला प्रकार होऊ शकतो. संमोहनाच्या माध्यमातुन माध्यमाला झोपेतील अवस्थेत इंस्ट्रक्शन दिले जाते की तुमचे शरीर आता अतीकठीन लाकडाप्रमाणे बणत आहे. आनी काही वेळातच त्याचे शरीर खरोखरच त्याप्रमाणे बणते आणि त्यानंतर त्याच्या वर कीतीही अवजड पदार्थ ठेवला तरी त्याच्या त्या माध्यमावर काही परीमाण होत नाही. हे कसे घडते हे जरा पाहू, त्या आधी आपण संमोहण शास्त्रामध्ये काय होते याची थोडी माहीती घेवू . वर सांगीतल्याप्रमाणे संमोहण शास्त्रामध्ये मनाचे दोन प्रकार आहेत बाह्यमण आनी अंतर्मण .. तर यामध्ये संमोहन शास्त्रज्ञ आधी माध्यमाचे(संमोहीत होणारा व्यक्ती) जागृत मन/ बाह्यमनाला शांत करतो. त्याच्या शरीरावरील प्रभाव कमी करतो आणि अंतर्मणाला जागृत करतो. आणी थेट अंतर्मणाशी संवाद साधल्याने शास्त्रज्ञ माध्यमाला जे काही सुचना देतो त्याप्रमाणे माध्यमाचे प्रचंड शक्तीशाली अंतर्मण त्यानुसार आचरण करायला सुरवात करते आणि येथुनच बाह्यमनाला अशक्य वाटारी गोष्ट शक्य व्हायला सुरवात होते.

सारांश . एक काम करा आजपर्यंत तुम्हाला ’अशक्य’ वाटणार्‍या गोष्टी आठवा .. आता या गोष्टी आजपर्यंत केवळ अशासाठी ’अशक्य’ होत्या की तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या अंतर्मणाच्या प्रचंड शक्तीबद्द्ल अज्ञात होता. आणि विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही योग्यप्रकारे या अंतर्मणातील शक्तीचा वापर करायला शिकाल त्यावेळी आता तुमच्या लॉजीलक बाह्यमनाला वाटणार्‍या अशा अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. कारण या जगात ’अशक्य’ ही एकच गोष्ट अशक्य आहे

या अंतर्मणाच्या शक्तीचा वापर कशाप्रकारे करायचा ह एक वेगळा विषय होऊ शकेल. सध्या आपला विषय आहे की लॉजीक वर अवलंबुन रहायचे की नाही. त्याच्याकडे थेडे पाहूया . यासाठी एक प्रश्न विचारात घेवू . समजा मी एक गोष्ठ ठरवली उदा. मला येत्या दोन महीन्यामध्ये टू व्हीलर गाडी घ्यायची आहे. तर मी काय करणार ? प्रथम दोन महीन्यात गाडी घेण्यासाठी चे प्लॅनिंग करणार म्हणजेच लॉजीक लावणार. जसे मी ठरवेन की गाडीची कींमत समथिंग ६०,००० आहे असे समजुया, तर मला पुढील महीण्यात माझी सॅलरी विस हजार मिळेल तर त्यातील दहा हजार + माझ्या बॅंक अकाउंट मध्ये असलेले विस हजार + माझ्या मीत्राकडून मला काही दिवसात पंधरा हजार यायचे आहेत  + इकडचे आणि तिकडचे असे मिळून साठ हजार जमवेन आणि गाडी घेईन . पण निट लक्ष द्या की या प्लॅनिगच्या प्रोसेस मध्ये मी लॉजीकची किती मोठी साखळी निर्माण केली आहे. सॅलरी, बॅंक मधील पैसे, मित्राकडुन येणारे आणि इकडचे तिकडचे वगैरे वगैरे. निट लक्ष द्या की ही आपल्या लॉजीक प्लॅनिंगची साखळी जेवडी मोठी असते तेवढेच ते प्लॅनिंग सक्सेस होण्याचे चॅन्सेस कमी होत असतात. म्हणजे समजा मी ठरवल्याप्रमाणे माझ्या मित्राणे माझे पैसे दिले नाहीत किंवा या महीन्यात काही कारणाने माझी सॅलरीच नाही झाली किंवा काहीही तर माझे प्लॅनिंग खड्ड्यात जाणार. 

थोडक्यात सांगायचे तर आपण आपल्या बाह्यमनाच्या आधारे लॉजिक लावतो एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा कशासाठीही आणि केवळ आपण आपण लावलेल्या लॉजीक वर अवलंबुन असतो आणि तेच लॉजीक काही कारणाने मोडले तर आपल्याला मिळ्वायची असलेली गोष्ट मिळत नाही आणि आपण दु:खी होतो. आणि बरोब्बर याच फेर्‍याला अध्यात्मशास्त्रात "माया" असे म्हटले आहे. असो. तो आपला विषय नाही. म्हणजे काय ? तर प्रचंड शक्तीशाली असलेल्या अंतर्मणाकडे आपण दुर्लक्श करतो आणि स्वता:ला एका चौकटीत बांधुन ठेवलेल्या बाह्यमनावर आपण अवलंबुन असतो. मी याठीकाणी "बांधुन ठेवलेल्या" हा शब्दप्रयोग अशासाठी करतो आहे कारण की आपण जेव्हा या जगामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण असंख्य संभावणा घेवून जन्माला येतो ... आणि जसजसे आपण मोठे व्हायला लागतो तसतसे आपण स्वत:वर बंधणे घालू लागतो जसे की सामाजीक बंधणे, जातीय बंधणे, धार्मीक बंधणे, नात्यांची बंधणे न जाणो आणखी कितितरी आणि हे होणे स्वाभावीक आहे कारण साधारणत: आपले लॉजीकल बाह्यामणच हे जागृत अवस्थेत असते. आणि या बंधनाच्या पलीकडे असणारे अंतर्मण हे सुप्त असते. 


आता आप्ण थोडे याच्याही पुढे जाऊ. हे जग असंख्य संभावणांनी बनलेले आहे. या जगात काहीही होऊ शकतो. जरुरी नाही की जे लॉजिकल आहे तेच इथे घडेल. इथे दोन आणि दोन चार होतीलच आसे नाही. इथे लिहायला वाचायला न येणारा पाणिणी सारखा मणुष्य पुढे जाऊन संस्कृत सारख्या भाषेचे व्याकरण लिहून महर्षी पाणीनी या नावाने ओळखला जाऊ शकतो. दहावी मध्ये नापास झालेला सचीन तेंडुलकर ... ठीक सहा वर्षानांतर दहावीच्या पाठ्यक्रमामध्ये त्याच नापास सचीन तेंडूलकरची यशेगाथा गायली जाऊ शकते. भीकारी म्हणुन हिनवला जाणारा ज्ञनू नंरत श्रीसंत ज्ञानेश्वर या नावाने सार्‍या जगाला वंदणिय ठरू शकतो. अशी कितितरी उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील. आणि हे सर्व होऊ शकते कारण बाह्यमणाच्या "लॉजिक" च्या ही पलीकडे काम करणारी माणवि मनामध्ये अंतर्मण नावाची शक्ती वास करत आहे. जी अमर्याद आहे, असिम आहे, जिचे मुळस्वरुप उर्जामय आहे , जिचा उल्लेख हिंदु धर्माच्या हटयोग, अष्टांगयोग, पतंजली योगदर्षन यांमध्य्न आपल्याला आढळतो, समाधी.. समाधी म्हणतो ती अवस्था म्हणजे तरी दुसरी काय अवस्था आहे याच अंतर्मणाची जागृत अवस्था म्हणजेच तर समाधी आहे . आपण जर निट अभ्यास केला तर आपल्याला आढळेल की जी जी लोक आज यशाच्या उच्च्यतर पदावर विराजमान आहेत ते कधीही "लॉजीक" वर अवलंबुन राहीले नाहीत.  आजपर्यंत आपल्या अनेक महान व्यक्तिंनी महर्शिंनी हेच तर सांगीतले आहे... की लॉजीक वर अवलंबुन राहू नका कारण माणवी बाह्यमनाच्या लॉजीकच्याही पलीकडे एक जग आहे ज्याला काहीही सिमा नाहीत . 


- सुरज महाजन (९६ ६५ ३५० ३३०)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा